sushant sinh rajput

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

महाराष्ट्र

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. त्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडला त्याचप्रमाणे चाहत्यांना  मोठा धक्का बसला आहे. त्याने घरात गळफास घेवून आपला प्रवास संपवला आहे. 

सुशांतने गेल्या वर्षी ‘छिछोरे’ चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. सुशांतच्या या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. सुशांतच्या नोकराच्या सांगण्यानुसार ते गेल्या काही दिवसांपासून फार  मानसिक तणावात हेता. यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न देखील करत होता. 

महत्त्वाचं म्हणजे पाच दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने देशील आत्महत्या केली. ८ जून  रोजी त्याच्या मॅनेजरने राहत्या इमारतीवरून उडी मारून त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यानंतर लगेच आता सुशांतने आत्महत्या केल्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात त्यानं किस देश में है मेरा दिल या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. तर पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता.

अंकिता लोखंडेसोबत त्याची पवित्र रिश्तामध्ये अतिशय चांगली केमिस्ट्री जुळली होती. हीच केमिस्ट्री प्रत्यक्ष आयुष्यातही जुळत होती. मात्र कालांतराने त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि या वादांची जागा ब्रेक-अपने घेतली. त्यानंतर त्याने समोर येत माध्यमांना याबाबतचे स्पष्टकरणही दिले होते.

Tagged