‘भाईजानने कधीही कोणालाही त्रास दिला नाही’; ‘या’ काँग्रेस आमदाराचा सलमानला पाठिंबा

महाराष्ट्र

मुंबई | सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका होत आहे. या टीकाकारांना काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सलमान खान एक दिलदार व्यक्ती आहे, त्याच्यावर असे आरोप करु नका. अशी विनंती त्यांनी टीकाकारांना केली आहे.झिशान सिद्धिकी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये झिशान सिद्धिकी यांनी सलमानचं कौतुक केलंय.

झिशान सिद्धिकी यांनी या व्हिडीओमध्ये त्यांनी 2014 चा एक किस्सा सांगितला आहे. कोणालाही न कळता मदत कशी करायची? हे त्यावेळी सलमानने शिकवलं होतं. असा दिलदार माणूस कोणाचं वाईट कसं काय करु शकतो? असा प्रश्न झिशान सिद्धिकी यांनी विचारला आहे.

सिद्धिकी यांचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.