लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे सरकार मागे घेणार

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना कालावधीत १८८ अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत. असे वळसे-पाटील म्हणाले.

Tagged