विधानपरिषद निवडणूक
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवार उतरवले आहेत. यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना संधी दिली आहे.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून निवडणूक होत आहे. भाजपकडून चार जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना यावेळी आशा होती की पक्ष संधी देईल, तसेच विनायक मेटे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत या दोघांची नावे नाहीत. त्यामुळे मुंडे व मेटे समर्थकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.