भीषण अपघातात दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड


जाटनांदूर | सुनील जेधे

बीड दि.3 : नेहमीप्रमाणे सकाळी शिरूर येथील महाविद्यालयात ड्युटीसाठी जात असलेल्या प्राध्यापकांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला, यामधे दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहराजवळील मुर्शदपुर फाटा येथे सोमवारी (दि.3) सकाळी घडली.

शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथिल प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर (वय 44 रा. जाटनांदूर ता.शिरूर) व प्राध्यापक अंकुश साहेबराव गव्हाणे (रा.पाली ता.बीड) अशी मयत प्राध्यापकांची नावे आहेत. देघेही शिरूर तालुक्यातील कालिकादेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी सातच्या सुमारास बीड येथून महाविद्यालयाकडे दुचाकीवर जात होते, यावेळी क्रेटा कारने (एमएच 14 जेई 5372) दुचाकीला जोराची धडक दिली, हा अपघात शहराजवळ नगर रोडवरील मुर्शदपुर फाट्याजवळ झाला. यामधे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged