मोदींसोबत घड्याळ चिन्हावर आगामी निवडणूका लढवणार!

न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा
बीड दि.1 ः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष माझ्या सोबत असून आगामी विधानसभा, लोकसभा या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्यासोबत घड्याळ चिन्हावर लढवणार आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार माझ्या सोबत आहेत. राज्याचे, देशाचे हित असलेले निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय आम्ही घेतलेला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (दि.1) अजित पवारांनी भूकंप घडवून आणला. ते एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शरद पवार यांच्यासाठी एक राजकीय झटका आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहेत. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असेही अजित पवार म्हणाले.


Tagged