dhananjay munde

बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने मिळाले मंत्री!

न्यूज ऑफ द डे परळी बीड


बीड दि. 01 : उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडचे धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळाले आहे.

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराजबाबा अत्राम यांनी तर पाहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनतर संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यांना कोणती खाते मिळणार हे रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. तर हे अजित पवार यांचे बंड असल्याचे उघड झाले असून याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

बातमी अपडेट करत आहोत, रिफ्रेश करावे…

Tagged