मुंबई : दि. 01
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
. अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.