areested

म्हाडा पेपर फुटी प्रकरणामध्ये बीडच्या महिला एजंटला अटक!

परीक्षार्थींना गोळा करण्याचे करायचे कामबीड दि.23 : म्हाडापरीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या […]

Continue Reading
dastgir shaikh

उपसा सिंचन योजनेच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू

पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणाचा बळी माजलगाव, दि.23 : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ एका खड्ड्यात पडून दस्तगीर बिलाल शेख (वय 15 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला ही घटना रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पांटबंधारे विभागाच्या हालगर्जीपणा चा बळी गेल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील सादोळा जलसिंचन उपसा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे. या कामासाठी […]

Continue Reading
suicide

रोडरोमिओच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या!

अंबाजोगाईच्या पट्टीवडगावातील घटना; तरुणावर गुन्हा दाखल अंबाजोगाई दि.13 : कॉम्प्युटरच्या क्लासेससाठी जाणार्‍या विद्यार्थिनीची येता-जाता सातत्याने छेड काढली जायची. रोजच्या रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पट्टीवडगाव येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

वडीलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही विहिरीमध्ये बुडून मृत्यू

आईमुळे वाचले दुसर्‍यामुलाचे प्राण परळी दि.13 : विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र या घटनेत दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी दुसर्‍या मुलानेही विहिरीत उडी मारली, वेळेवर आईने विहिरीत दोर सोडल्यामुळे दुसर्‍यामुलाचे प्राण वाचले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यातील […]

Continue Reading

बायकोला भेटायला गेलेला जावाई सासरवाडीतून बेपत्ता!

केज दि.13 ः माहेरी गेलेल्या बायकोला भेटण्यासाठी सासरवाडीला गेलेला जावाई बेपत्ता झाल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आशुतोष सुनील कोकाटे (वय 22 रा. खोडस ता.केज) हा 8 मे रविवारी पत्नी निकिता हिला भेटायला चिंचोली माळी येथे गेला होता. पत्नीला भेटल्यानंतर तो चिंचोली माळी येथे […]

Continue Reading

धामणगांव घाटात कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू!

बीड दि.11 : पुण्याहून बीडकडे येत असलेल्या बीडमधील टेकवाणी कुटूंबीयांच्या कारला धामणगांव घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी […]

Continue Reading
acb office beed

एलसीबीकडे न पाठवण्यासाठी मागितली पन्नास हजारांची लाच!

लाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!बीड दि.11 : दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसिल कार्यालयात करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय 34 रा.कामखेडा.ता रेणापुर जि.लातुर) असे लाचखोर पोलीस […]

Continue Reading

लग्नाऐवजी अंत्यसंस्कार! मंडप उभारताना विजेचा धक्क्याने नवरीच्या वडीलांचा मृत्यू

वडवणी तालुक्यातील टोकेवाडीतील दुर्देवी घटना वडवणी दि.23ः मुलीच्या विवाहाची लगबग.. कुटूंबातील सर्वजण आपआपली कामे अटोपत होती. लग्नाचा मंडप उभारण्यासाठी नवरीचे वडील मदत करत होते. यावेळी दुर्देवाने मंडप उभारतांना विद्यूत तारेचा धक्का लागला अन् यामध्ये नवरीच्या वडीलांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तालुक्यातील टोकेवाडी येथे गुरुवारी (दि.22) रात्री उशीरा घडली. आज थाटात विवाह सोहळा संपन्न होणार […]

Continue Reading