स्कुटीवरुन गुटख्याची विक्री!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांविरोधात गुन्हा नोंद
बीड
दि.16 : दुचाकीवरुन गुटखा (guthaka) विक्री करणार्‍या दोघांना सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (ips pankaj kumavat) यांच्या पथकाने केली. त्यांच्याकडून 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी (दि.15) सकाळी कोल्हेवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली असून केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

केज तालुक्यातील कोल्हेवाडी ते तरणळी जाणार्‍या रस्त्यावर नागझरी फाट्याजवळ एका स्कुटीवरुन प्रज्वल उर्फ बबलू संजय तपसे व गोकुळ रामभाऊ धुमाळ (दोघेही रा.शिनगारे गल्ली, धारूर) हे गुटखा विक्री करत होते. यावेळी त्यांना ताब्यात घेत स्कुटी, गुटखा, गुटख्याची रक्कम, मोबाईल असा 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बबलू व गोकूळसह संजय रामलिंग तपसे, अरुण बडे (रा.सिरसाळा) यांच्यावर केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंंदे, प्रकाश मुंडे, प्रकाश मुंडे, विकास चोपणे यांनी केली. (kaij police station)

Tagged