दिंद्रूड हद्दीत गुटखा जप्त; एएसपी नेरकर यांच्या पथकाची कारवाई!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


महारुद्र मुळेसह सात जणांवर गुन्हा दाखल
दिंद्रूड
दि.14 ः माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी (दि.13) दिंद्रूड येथे दुकानात छापा मारला असता अडीच लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाने रात्रीच्यावेळी छापा मारला यावेळी ईश्वर गौडर (वय 28) हा गुटख्याची विक्री करताना आढळून आला. त्यानंतर दुकानाच्या पाठीमागे गोदामात वेगवेगळ्या पांढर्‍या पिशव्या व बॉक्समध्ये गुटखा मिळून आला. असा 2 लाख 45 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. हा गुटखा महारुद्र उर्फ आबा मुळे (रा.बीड), बब्बू शेख, बाळू गुजर (रा.बीड) व इतर तीन असे सात जणांवर दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी तागड, पोह.संजय राठोड, देवानंद देवकाते, महिला पोलीस मेंडके यांनी केली.

Tagged