one plus nore ce 5g

आता अवघ्या ₹1,177 रुपयांत One Plus चा 5G स्मार्टफोन होणार तुमचा

बीड

मुंबई: One Plus कंपनीच्या स्मार्टफोनचं (One Plus smartphones) नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. याच कारण कारणही तसंच आहे. भारतात One Plus हा सर्वाधिक आवडता स्मार्टफोन आहे. हा फोन घेणं अनेकांचं स्वप्न असतं मात्र पैशांची अडचण असल्यामुळे किंवा बजेटमध्ये नसल्यामुळे हा फोन काही लोक घेऊ शकत नाहीत. मात्र आज अशा सर्व लोकांसाठी खूशखबर आहे. आता One Plus चा लेटेस्ट स्मार्टफोन (One Plus latest smartphones) तुम्हाला अवघ्या 1,177 रुपयांत घरी घेऊन जाता येणार आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल (Special offer on smartphones) सांगणार आहोत.

भारतात नुकताच OnePlus Nord CE 5G हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन लाँच झाल्यापासूनच अनेकांनी याला पसंत केलं आहे. या फोनमध्ये फ्रंटवर 5G सपोर्ट, 8 GB RAM आणि पंच होल कटआउट आहे. त्यामुळे हा यूजर्सच्या पसंतीस उतरतो आहे. म्हणूनच Amazon या इ-कॉमर्स वेबसाईटनं हा फोनात EMI वरही उपलब्ध करून येण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा फोन तुम्हाला अवघ्या 1212 रुपयांचं डाऊन पेमेंट (Down payment) करूनऑर्डर करता येणार आहे.

हे आहेत या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड सीई 5G मध्ये 6.43 इंचाचा एमोलेड पंच होल डिस्प्ले (Punch Hole display) आहे जो सेल्फी कॅमेरासाठी वापरला जातो. या फोनमध्ये 90hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6 GB, 8 GB आणि 12 GB RAM मध्ये उपलब्ध आहे. तसंच यात 128 GB स्टोरेज आणि 256 GB स्टोरेज असे पर्याय उपलब्ध आहेत.

कोणाला मिळणार या EMI सवलतीचा लाभ

Amazon.in वर या स्मार्टफोनची मूळ किंमत 24,999 इतकीच आहे. जर तुम्हाला हा फोन EMI वर घ्यायचा असेल तुम्हाला यासाठी दरमहा 1,177 रुपये भरावे लागणार आहेत. मात्र ही खास ऑफर फक्त HDFC बँक आणि कार्ड होल्डर्ससाठी असणार आहे. EMI वर फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला या फोनच्या मूळ किंमतीवर 4092 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.