‘डॉन’ने घेतला अखेरचा श्वास

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


बीड दि.6 : बीड पोलीस दलातील श्वान ‘डॉन’ ने शनिवारी (दि.6) सकाळी अखेरचा श्वास घेतला.
डॉन हा एक वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. त्याने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य बजावलेले आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आजारी होता. आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉनचा 11 वर्ष वयाचा होता. डॉनने भोपाळ येथे नॅशनल चॅम्पियन पदक पटकावले होते. योगेश्वरी मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपी पकडून देण्यात डॉनचा सिंहाचा वाटा होता. यासह बीड पोलिसांना अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मदत केली होती. डॉनचे हँडलर संजय खाडे, अमोल तुपे, ज्ञानेश्वर वखरे हे होते.

Tagged