बिबट्याच्या आणखी एक हल्ला; जोगेश्वरी पारगाव मधील महिलेचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला होता ती घटना होत नाही तोच बिबट्याने आणखी एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत.
सुरेखा निळकंठ भोसले वय 45 असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार आष्टीपासून 11 ते 12 किमी अंतरावर असलेल्या पारगाव बोराडे येथील वस्तीवरील शालनबाई शहाजी भोसले ही महिला शेतात भाजी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या बिबट्याच्या शोधात वन विभागाचे पथक देवीगव्हान येथे गेले असता पाठीमागे पारगाव येथे पुन्हा सुरेखा यांच्यावर हल्ला झाला. यात त्या ठार झाल्या आहेत.
कालच बिबट्याने मंगरूळ शिवारात तुरीच्या पिकाची कापणी करत असलेल्या माय- लेकरावर हल्ला चढवला. यात हे दोघे थोडक्यात बचावले. या हल्ल्यात मुलाच्या हाताला आणि आईच्या कमरेला जखम झाली आहे. यापुर्वी सुर्डी गावचे आष्टी पंचायत समितीचे सदस्य पती गहिनीनाथ गर्जे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी दुपारी कीन्ही येथे स्वराज सुनील भापकर या 10 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

Tagged