सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र विदर्भ

चंद्रपूर : आनंदवन येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी दुपारी विष घेऊन आत्महत्या केली आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. डॉ. बाबा आमटे यांची नात असलेल्या डॉ. शीतल आमटे ह्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. त्यांनी समाजकारणात बाबा आमटेंच्या तिसर्‍या पिढीचं नेतृत्व केलं. त्यांनी राहत्या घरी आनंदवन येथे विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चित्र रेखाटल होतं. ज्याला वॉर अ‍ॅन्ड पीस असं शिषर्क दिलेले आहे.

Tagged