collector jagtap

बँकांचे कामकाज पूर्णवेळ सुरू राहणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश

बीड : जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज ३१ मे पासून नियमित वेळेनुसार पूर्णवेळ सुरू राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

आदेशात पुढे म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांच्या नियमित ठरलेल्या वेळेत काम करावे. जेणेकरून खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्ज वितरणास गती मिळण्यास मदत होईल. यासाठी सर्व बँका पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.

Tagged