Corona

बीड जिल्हा : आज ५३६ पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. शनिवारी (दि.२९) कोरोनाचे ५३६ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

जिल्ह्यातून शुक्रवारी ५६७९ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले, त्यामध्ये ५३६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५१४३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १५३, अंबाजोगाई १९, आष्टी ७३, धारूर २२, गेवराई ५३, केज ५७, माजलगाव ४६, परळी १२, पाटोदा २३, शिरूर ५२ तर वडवणी तालुक्यात २६ रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रतिदिवस आढळणारी रुग्णसंख्या दीड हजारांवरून ५०० वर जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

Tagged