BEED CIVIL HOSPITAL

बीडचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतिश सूर्यवंशी

न्यूज ऑफ द डे बीड

आरोग्य विभागाने काढले आदेश

बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सतिश दयाराम सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (दि.५) काढले आहेत.

बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. त्यांनी त्यांनी योग्य पद्धतीने आरोग्य विभागाचा कारभार हाताळला. त्यांच्या जागी आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सतीश दयाराम सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.