वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षक भरतीची चौकशी करा

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

आ.संजय दौंड यांची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

अंबाजोगाई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी भरतीवरून वाद सुरु आहे. या वादात आता आमदार संजय दौंड यांनी उडी घेतली आहे. महाविद्यालयातील शिक्षक भरतीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

  पत्रात पुढे म्हटले की, 2005 च्यानंतर जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभासदा मधून निवडणूक झालेली नाही. आजपर्यंतचा चेंज रिपोर्ट सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. कोणत्याही कार्यकारी मंडळाला कर्मचारी भरतीचे अधिकार नसताना 2008 पासून 2021 पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. ती नियमबाह्य असून सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संजय दौंड यांनी केली आहे. याच मागणीनंतर सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या औरंगाबाद कार्यालयाने वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्यला पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी स्वतःला सहसंचालक हे वैद्यनाथ महाविद्यालयाला भेट देणार असून यावेळी 2008 पासून आतापर्यंत महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना या नियुक्त्या दिल्या आहेत. त्या या संदर्भातली चौकशी करण्यात येणार असल्याचे ह कळवले आहे. दरम्यान, या महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Tagged