पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे असल्याचा विश्वासही यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं म्हणत, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचं काम केलं
पवार कुटुंबियांच्या पारिवारिक वादात काँग्रेसला पडायचं नाही आणि त्यांच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवर बोलताना मत व्यक्त केलं आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासानंतर भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचं काम केलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लावत भाजपवर निशाणा साधला आहे.