काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई : भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांनी गुरुवारी राज्यातील नेत्यांसमवेत बैठक घेतली असल्याने आता काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एच.के. पाटील यांची नुकतीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवड झालेली आहे. ते राज्याच्या दौर्‍यावर प्रथमच आले होते. गुरुवारी त्यांनी मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली. त्यामुळे बैठकीस उपस्थित असलेले काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही होण्याची शक्यता आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

Tagged