dastgir shaikh

उपसा सिंचन योजनेच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू

पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणाचा बळी माजलगाव, दि.23 : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ एका खड्ड्यात पडून दस्तगीर बिलाल शेख (वय 15 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला ही घटना रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पांटबंधारे विभागाच्या हालगर्जीपणा चा बळी गेल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील सादोळा जलसिंचन उपसा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे. या कामासाठी […]

Continue Reading

हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे

मुंबई | भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे, असं लोणीकर म्हणालेत. तुम्ही गावागावात जाऊन सांगा […]

Continue Reading
bpcl

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

मुंबई | केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने […]

Continue Reading

फरार आरोपींच्या मालमत्तेवर येणार टाच

फरार आरोपींच्या मालमत्तेवर येणार टाचबीड, दि.17 : आरोग्य भरती गट क आणि गट ड प्रकरणात बीड जिल्ह्यातील अनेक बडे आरोपी अद्यापही फरार झालेले आहेत. पोलीसांनी आता त्यांचे बँक अकाऊंट आणि त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. त्यामुळे आरोपींना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.पुणे सायबर पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 10 […]

Continue Reading
ajit pawar

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार

पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालक घेतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे […]

Continue Reading
acb office beed

लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

माजलगाव : मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. -येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना […]

Continue Reading
balasaheb takat

आडत व्यापारी बालासाहेब माणिकराव ताकट यांचे दुःखद निधन

माजलगाव- तालुक्यातील रोशनपुरी येथील रहीवाशी आणि आडत व्यापारी बालासाहेब माणिकराव ताकट यांचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 60 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपुर्वी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. माजलगावात तब्येत खालावत चालल्यानंतर त्यांना औरंगाबादच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. मंगळवारी (दि.14 डिसेंबर) रात्री साडेनऊच्या […]

Continue Reading
prajakt tanpure

महेबूबभाईच्या गावाला निधी कमी पडू देणार नाही -ना. प्राजक्त तनपुरे

शिरूर, दि. 14 : शिरूरचे भुमिपूत्र तथा आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिरूर नगर पंचायतचे सर्व उमेदवारांना विजयी करा. या शहराच्या विकासासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे अवाहन नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. मंगळवारी शिरूर नगर पंचायतीसाठी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी ना.प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, आ.बाळासाहेब आजबे यांनी […]

Continue Reading
wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना प्रतिनिधी । वडवणीदि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक […]

Continue Reading