corona virus

कोरोना बाधितांचा आकडा तिनशेपार!

बीड दि.22 ः राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत आहे. हळूहळू हा आकडा वाढतच आहे. शनिवारी (दि.22) जिल्ह्यात 307 कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.22) प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 2 हजार 414 रुग्णांची तपासणी केली असता […]

Continue Reading

वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून!

घटनास्थळी पंकज कुमावतांची धाव नांदूरघाट दि.22 ः दगडाने ठेचून एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे शनिवारी (दि.22) सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील […]

Continue Reading
school Palwan

बीड जिल्ह्यात सोमवारपासून केवळ 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होणार

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा निर्णय बीड, दि. 21 : शाळा सुुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर दिल्यानंतर अधिकारी वर्गाची मनमानी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्ह्यातील केवळ 10 आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी […]

Continue Reading

17 चंदन तस्करांसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.21 : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्‍यांनी गेवराई तालुक्यात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी 17 चंदनतस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 87 हजाराचे चंदन, […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

सावकाराच्या जाचास कंटाळून कंत्राटी कर्मचार्‍याची आत्महत्या

सावकारावर सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल सिरसाळा दि.20 ः खासगी सावकाराच्या सततच्या जाचास कंटाळून एका कंत्राटी कर्मचार्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) पहाटेच्यासुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज सर्जेराव गिरी (38 रा.माळी चिंचोली ता.केज.ह. मु. सिरसाळा) असे मयताचे नाव आहे. मेघराज हे दुरसंचार विभागात कंत्राटी […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर वाहन निरिक्षकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

बीड एसीबीची कारवाईबीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत […]

Continue Reading