दोन कोटीचे चंदन जप्त!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

दोन कोटीचे चंदन जप्त!

  • बीड पोलिसांच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ
    बीड दि.5 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड पोलीस प्रशासन सतर्क असून अवैध धंद्यावर कारवाईचे धाडस तर सुरू आहे. यातच केज पोलीस ठाणे हद्दीमध्ये तब्बल दोन कोटी रुपये चंदन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांच्यावतीने रविवारी (दि.5) पहाटे करण्यात आली. याप्रकरणी 1200 किलो चंदन जप्त करण्यात आले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. हे चंदन कोणाचे आहे? याचा अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही धाव घेत या घटनेची माहिती घेतली आहे. अधिक तपास सुरू असून याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Tagged