crime

पोटच्या मुलाने दारुच्या नशेत केला आईचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पळून जाणार्‍या मुलाला पाठलाग करत शहागड येथून घेतले ताब्यात
नेकनूर
दि.21 ः रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून जाणार्‍या मुलाला दिड तास पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेतले. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना यश आले.
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70 रा.चौसाळा ता.बीड) असे मयत महिलेच नाव आहे. दारुच्या नशेत मुलगा मदन पांडुरंग मानगिरे (वय 28) याने आई प्रयागबाई यांना शुक्रवारी (दि.20) रात्रीच्या सुमारास मारहाण केली. यामध्ये प्रयागबाई यांचा मृत्यू झाला. रात्री केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे, ही बाब शनिवारी सकाळी पांडुरंगच्या लक्षात येताच त्याने घरातून पळ काढला. बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता, याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच त्यांनी शहागड येथून संशयित आरोपी पांडूरंग यास ताब्यात घेतले. तसेच एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged