जय महेश कारखान्यातील अपघातात कामगाराचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव


माजलगाव दि.21 : तालुक्यातील जय महेश कारखान्यात भुसाच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.21) रात्री 9 घ्या दरम्यान घडली.

कल्याण गणपती टोले (वय 40 रा.आनंदगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) ते कामगार म्हणून कामाला होते. मंगळवारी कारखान्यात दुरुस्तीचे काम चालू होते. रात्री 9 च्या सुमारास कल्याण टोले हे बॉयलर जवळ काम करत असताना अचानक भुसाच्या बेल्टमध्ये अडकून त्यांचा डोक्याला गंभीररित्या जखम झाली, त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. टोले याच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. आनंदगावमध्ये आठ दिवसात तरुणाचा हा दुसरा अपघाती मृत्यू असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Tagged