SANJAY RAUT

संजय राऊत SANJAY RAUT यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

न्यूज ऑफ द डे

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली फिर्याद

प्रतिनिधी । बीड
दि.23 : राज्यसभेचे सदस्य खा.संजय राऊत यांच्या विरोधात बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी गुरूवारी (दि.23) तक्रारी दिली होती.

मुळूक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीवर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना मारण्याची सुपारी गुंड राजा ठाकूर याला दिलेली आहे. राऊत यांनी संदर्भात पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिलेली आहे. परंतु राऊत यांनी हा आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी ही तक्रार दिलेली असून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची यातून बदनामी झालेली आहे. त्यामुळे आमच्यात उदग्नितेची भावना निर्माण झालेली असून त्यातून द्वेश व वैमनस्य वाढीस लागत आहे. राऊत यांनी जाणीवपूर्वक ही कृती केलेली असून  त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सचिन मुळूक यांनी तक्रार अर्जातून केली होती. त्यांच्या तक्रार अर्जावरून बीड शहर ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 211, 153 (अ), 500, 501, 504, 505 (2) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाचा तपास महादेव ढाकणे करीत आहेत.

—————-

Tagged