PANGAT

पंगतीला जेवायला वाढले नाही; एकास बेल्टने मारहाण

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

प्रतिनिधी । अंबाजोगाई
दि.25 : लग्नाच्या पंगतीस जेवायला वाढले नसल्याने एकास बेल्टने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथील शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी ( दि. 24) घडली. या प्रकरणी चौघा विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील घाटनांदुर येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केशव गोपीनाथ मुंडे (रा. कन्हेरवाडी ता. परळी) या तरुणास, तू घरातील लग्न असताना आम्हाला पंगतीला जेवायला का वाढले नाही, असे कारण काढून गावातील नितीन विश्वनाथ मुंडे, अमोल विश्वनाथ मुंडे, सचिन विश्वनाथ मुंडे व आकाश ज्ञानोबा मुंडे यांनी त्यास बेल्टने हातावर, कमरेवर मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी केशव गोपीनाथ मुंडे याच्या फिर्यादीवरुन चौघाविरुध्द अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार मुंडे करीत आहेत.

Tagged