पैसे घेऊन पद वाटत असल्याने सुषमा अंधारेंना शिवसेना जिल्हाप्रमुखांची मारहाण?

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

  • जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ
  • सुषमा अंधारे यांनी मात्र मारहाणीचा आरोप फेटाळला
    प्रतिनिधी । बीड
    दि.18 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील एक कानाखाली ठेवून दिली’ अशी स्पष्ट माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी ‘कार्यारंभ’ला दिली. त्यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून त्यात मारहाण केल्याची माहिती दिली आहे.

  • शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तु मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून त्यांना विविध वस्तु दिल्या. आम्ही काही देण्यास नकार दिला की आमचं निगेटीव्ह वार्तांकन उध्दव साहेबांकडे करीत होत्या. या संदर्भात मी स्वतः उध्दव साहेबांना थेट बोललो. त्यांच्या अशा वागणुकीच्या तक्रारी देखील केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा प्रकार सुरूच होता. आज सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी अंधारे यांना मी बाजूला घेऊन या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना मी म्हणालो तुम्ही असे पैसे घेऊन किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का पदे वाट आहात? त्यावरून त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेऊन दिली. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे स्वाभीमानानेच मी पक्षासाठी काम करणार. मला अशा प्रकारचा अन्याय सहन होत नाही. त्यांचा सगळा प्रकार अति झालेला असल्यानेच माझा नाविलाज झाल्याचे अप्पासाहेब जाधव म्हणाले.
    या प्रकारानंतर आप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यात वरेकर यांनी आप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली.

https://www.facebook.com/karyarambha/videos/9279685092101962/?mibextid=rDevPmGZMQi40V7b

शिंदे गटाकडून काही तरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे.
सुषमा अंधारे
शिवसेना नेत्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)