arrested criminal corona positive

कोटींचा गंडा घालणार्‍या परिवर्तन मल्टीस्टेटचा मुख्याधिकारी पकडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा माजलगाव

अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड,  दि.17 : ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेतील मुख्याधिकार्‍यास गुरुवारी (दि.17) सकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली. 
      माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेने ठेवीदाराना अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधी रुयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरनं.117/2018 कलम 420, 409, 34 प्रमाणे बँकेतील संचालक मंडळासह 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत 18 आरोपींना पोलीसांनी अटक केलेली आहे. तर 17 आरोपी हे फरार आहेत. गुरुवारी सकाळी बँकेचा मुख्याधिकारी किसन नागोराव मिसाळ (वय 45 रा.पंचशीलनगर माजलगाव) यास अर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचत ताब्यात घेतले. मिसाळ हा अनेक महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत फिरत होता. अखेर गुरुवारी त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस अर्थिक गुन्हे शाखेचे पोनि.सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, पोह.सुरेश सांगळे, पोना.राजु पठाण व चालक अशोक नन्नावरे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Tagged