1 लाख 36 हजारांचा मोबाईल 2 मिनिटात ‘आउट-ऑफ-स्टॉक’

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

असं काय आहे या मोबाईलमध्ये

दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांच व्यवहार ठप्प झाले असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. पंरतु अशा काळातही हौसेला मोल नसते हेच खरे. तब्बल 1 लाख 36 हजार रुपये किंमत असलेला मोटोरोलाचा फोल्डेबल फोन अवघ्या दोन मिनिटात विकला गेला आहे. त्यामुळे अश्यर्य व्यक्त केले जात आहे.
      टेक ब्रँड मोटोरोलाचा फोल्डेबल मोटोरोला आर-झेडआर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. कंपनीने आता याचे अपग्रेड व्हर्जन आणले आहे. नवीन मोटोरोला आर-झेडआर चा पहिला सेल नुकताच पार पडला. अवघ्या दोन मिनिटात सर्व फोन विकले गेले. यात आश्चर्य म्हणजे या फोनची किंमत 30 – 40 हजार नव्हे तर तब्बल 1 लाख 36 हजार रुपये आहे. फोनची किंमत इतकी महाग असूनही ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने या फोनचा पुढचा सेल आता 21 सप्टेंबर रोजी ठेवला आहे. फोल्डिंग स्क्रीनसाठी मोटोरोने या फोनमध्ये खूप खास हिंज मॅकनिज्म दिले आहेत. लेनोवाने यासंबंधी डिटेल्स शेयर केले आहेत. कंपनीने म्हटले की, मोटोरोला आर-झेडआर इंडस्ट्रीचा एक्सक्लूसिव 100 हून अधिक पेटेंट्सचा स्टार ट्रॅक शाप्ट वापर करतो. या हिंज च्या मदतीने स्क्रीन कर्व्ड होवून फोल्ड होते. तसेच वारंवार फोल्ड झाल्यानंतर सुद्धा फोन ओपन करताना डिस्प्ले फ्लॅट होतो. तसेच वापर करण्यास सोपे जाते. हा मोबाईल 200,000 वेळा फोल्ड -अनफोल्ड केले जावू शकते. याचाच अर्थ एखादा युजर फोनचा वापर कमीत कमी 5 वर्षापर्यंत करू शकतो. तसेच या फोनमध्ये फ्लेक्सिबल स्क्रीनचा वापर वॉटरड्रॉप शेपमध्ये करतो. सर्वात आधी लेनोवोना रिसर्च इंस्टीट्यूटकडून इंट्रोड्यूस करण्यात आला. तसेच इलास्टिक मेटल स्ट्रक्चर डिस्प्ले ला ओपन केल्यास फ्लॅट ठेवतो.

Tagged