antigen test ashti dist beed

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये जिल्हाभरात 210 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. यात 210 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे पहिल्या दिवसाच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आज कमालीचा वाढणार आहे. आणखी दोन दिवस या तपासण्या चालणार आहेत.

अ‍ॅन्टीजेन टेस्ट केलेला आकडा सुरुवातीला व त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण
अंबाजोगाई – 1697 – 37
आष्टी – 629 – 17
केज – 684 – 19
माजलगाव – 1425 – 71
परळी – 1321 – 66
एकूण – 5756 – 210

बीड कोरोना अपडेट (17 ऑगस्ट पर्यंतचे)
एकूण रुग्ण- 2652
कोरोना मुक्त 1520
एकूण मृत्यू- 71
उपचार सुरु- 1091
(ही आकडेवारी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेली आहे. यात आजचे 18 ऑगस्टचे आकडे सामाविष्ट नाहीत.)

कुणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह, व्यापार्‍यात गैरसमज
अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास काही व्यापार्‍यांनी नकार दिला आहे. बीडमध्येही अनेकांनी टेस्ट केलेल्या नाहीत. अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये कोरोना नसला तरी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे, अशी भीती व्यापार्‍यांमध्ये पसरलेली आहे. आरोग्य प्रशासनाने हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यामुळे अनेकजण या टेस्टपासून चार हात दूर आहेत. आता जेव्हा मार्केटवरील लॉकडाऊन जिल्हाधिकारी उठवतील तेव्हा ज्यांनी टेस्ट न करता दुकाने उघडली, अशांवर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

Tagged