पैठण तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आडुळ येथे आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पैठण दि. १४: पैठण तालुक्यातील आडुळ येथे सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडुळ येथील अशोक गोविंदराव भावले (वय ५७) या शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापीक शेतीला कंटाळून सोमवारी (दि.14) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतामध्ये चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीने तलाठी व मंडळ अधिकारी यांचे पथक घटनास्थळ पाठविले. दरम्यान पाचोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

Tagged