DEATH BODY

बीड जिल्हा : कोरोनाचा आठवा बळी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर सुरु आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना गेवराई तालुक्यातील उमापूर येथील कोरोनाग्रस्ताचा शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.


उमापूर येथील 60 वर्षीय पुरुष आजारी होता, त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत आल्यामुळे बीड येथील कोविड रुग्णालयात दि.7 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर तो दि.9 रोजी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याचा आज सायंकाळी साडेसात वाजता बीड येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Tagged