बजरंग सोनवणेंना धक्का; गावात मुलीचा पराभव

केज न्यूज ऑफ द डे

सारणी आनंदगावमधून प्रविणा संतोष सोनवणे विजयी

केज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्वतःचे गाव असलेल्या सारणी आ. येथे त्यांच्या कन्या डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांचा ११० मतांनी पराभव झाला असून त्यांच्या विरोधातील प्रविणा संतोष सोनवणे विजयी झाल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी केज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या डॉ. हर्षदा सोनवणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही बजरंग सोनवणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ.हर्षदा यांना उतरवले होते. त्यांचा सामना पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी व काँग्रेसचे नेते राहुल सोनवणे यांच्या भावजयी असलेल्या प्रविणा सोनवणे यांच्याशी झाला. त्यांनी डॉ. हर्षदा यांचा ११० मतांनी पराभव केला.

Tagged