नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ‘या’ दिवशी ठरणार

न्यूज ऑफ द डे बीड

नगरविकास मंत्रालयाकडून आदेश

बीड : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी (दि.27) निश्चित होणार आहे. याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरविकास मंत्रालयाने विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदाची आरक्षण निश्चित होणार आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात गुरुवार, दि.27 जानेवारी 2022 रोजी दुपारी 04.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सोडतीसाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहावे. सदर सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरनसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील 10 लोकप्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, अशा सूचना नगरविकास मंत्रालयाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी -छापवाले यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना दिल्या आहेत.

Tagged