majalg

नाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले

न्यूज ऑफ द डे मराठवाडा शेती

पैठण : येथील नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने शुक्रवारी पहाटे बारा वर्षानंतर आपत्कालीन दरवाजे उघडले असून गोदावरी नदीमध्ये जवळपास एक लाखाच्या आसपास पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना  कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे.

गत चौदा दिवसापासून येथील नाथसागर धरणातून गोदावरी नदीत कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा  विसर्ग वरील धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन करण्यात येत होता. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्या धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने शुक्रवारी पहाटे प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. धरण निर्मिती झाल्यापासून तब्बल बारा वर्षापूर्वी सन १९७६ मध्ये १ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग, १९८० मध्ये १ लाख ३ हजार, १९९० मध्ये १ लाख ८७, ६५२, १९९४ मध्ये १ लाख १६ हजार, २००६ मध्ये २ लाख ५० हजार ९९५, २००८ मध्ये १ लाख ५४ हजार ५०४ अशा पद्धतीने गोदावरी नदीमध्ये एकूण २७ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तब्बल बारा वर्षानंतर २०२० मध्ये नाथसागर धरणातून आज (दि.१८) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत रोजी ९४ हजार ४४५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणी वहन क्षमता मोठी असल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना स्वतः सावधान राहून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नाही असे आवाहन तालुका प्रशासनवतीने करण्यात आले आहे. सध्या या धरणामध्ये ५० हजार ५०० क्युसेक पाण्याचे आवक येत आहे. आवक कमी झाल्यास सायंकाळपर्यंत कुठल्याही वेळेत २७ पैकी ९ असलेले आपात्कालीन दरवाजे बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी सज्ज झालेले आहे.

Tagged