dhananjay munde

गौण खनिजसह इतर निधीच्या खर्चाचे होणार ‘नियोजन’

न्यूज ऑफ द डे बीड

पालकमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा

बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.25) सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत विविध विभागांचा आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मुंडे हे 5.30 वाजता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महावितरण कंपनी, जिल्हा परिषद विभागाच्या राबविण्यात येणार्‍या विविध योजनांसाठी मुदतीत खर्च करण्यासह गौण खनिज निधी वाटपाबाबत आढावा घेतील. त्यानंतर 6 वाजता वडवणी येथील क्रिडा संकुलास जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. शेवटी 6.30 वाजता कोरोना काळातील प्रलंबित देयके अदा करण्याबाबत आढावा घेणार असून संबंधित अधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Tagged