corona

बीड जिल्हा : आज सातशे पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

कोरोनाबाधितांचा टक्का १० वर

बीड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला असून महिनाभरातच ३४ टक्क्यांवरून १० वर आला आहे. शुक्रवारी (दि.२८) कोरोनाचे ७०० रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

जिल्ह्यातून गुरुवारी ६६६९ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले, त्यामध्ये ७०० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५९६९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २५१, अंबाजोगाई ३९, आष्टी ५६, धारूर २१, गेवराई ८३, केज ६४, माजलगाव ४६, परळी १४, पाटोदा ४८, शिरूर ५५ तर वडवणी तालुक्यात २३ रुग्ण आढळून आले. दरम्यान, बाधितांचा टक्का आता मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Tagged