corona virus

जिल्ह्यासाठी कोरोनाची आनंदाची बातमी!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.26 : सांभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्हा आरोग्य प्रशासनाला 1049 कोरोना संशयितांचे अहवाल प्राप्त झाले होते. ते सर्वच निगेटिव्ह आढळून आले असून रविवारी एकही बाधित आढळून आला नाही. ही बीड जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. मे 2020 मध्ये पहिला रुग्ण आढळल्यापासून दररोज काही न काही रुग्ण आढळून येत होते. मात्र आज (दि. 26 डिसेंम्बर 2021) पहिल्यांदाज जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्हा प्रशासनाकडून आज प्रसिध्दीस देण्यात आलेल्या अहवालात 1049 जणांचा स्वब तपासणीसाठी दिला होता. त्यात एकही अहवाल पॉजीटिव्ह आला नाही. त्यामुळे आहे जिल्ह्याला हा सुखद धक्का आहे.

53 रुग्ण ऍक्टिव्ह
जिल्ह्यात आज एकूण 53 रुग्ण कोरोना पॉजीटीव्ह असून ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज पर्यंत 1 लाख 3 हजार 684 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले. त्यात 2839 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Tagged