गोवंशीय प्राण्यांची दिवसाढवळ्या कत्तल; आष्टी पोलीसांची कारवाई
बीड दि.26 : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये कत्तलखान्यावर गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती आष्टी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी यांनी इतर सहकार्यांच्या मदतीने शनिवारी (दि.25) रात्री कत्तलखान्यावर पंचसमक्ष छापा मारला. यावेळी टेम्पोसह चार वाहने, कत्तलखान्यातील साहित, गोमास असा 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे. या प्रकरणी या प्रकरणी कत्तलखाना चालक खलील हरुन शेख (रा.दौलावडगाव ता.आष्टी), जावेद अहमद कासम कुरेशी (रा.पारशहा कुंट गंजबाजार अहमदनगर) यांच्यासह अन्य साथीदारांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून कत्तलखाना सुरु आहे. त्यामध्ये गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. छापा मारल्यानंतर कत्तलखान्यातील कामगार पोलीसांना पाहून पळून गेले. यावेळी घटनास्थळी टेम्पो (एमएच-10 झेड-4083), दुसरा टेम्पो (एमएच-23 डब्लू-3983), अशोक लिलन्ड टेम्पो (एमएच-03 सीपी-6499), पिकअप (एमएच-16 ऐइ-5404) या वाहनामध्ये गोमांस तसेच कत्तलीसाठी बांधून ठेवलेली गोवंशीय प्राणी आढळून आले. एकूण 19 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पशुवैद्यकिय अधिकारी यांना गोवंश जातीचे मास नमुना तपासकामी काढून दिले. सदरील वाहने अंभोरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी, उपनिरीक्षक देशमाने, पोना.राठोड, पोशि.केदार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.डोंगरे, धोक्रट, पोह.ठेंगळ, मिसाळ, काचगुंडे, वायबसे यांनी केली.