जिल्हाधिकारी उद्या माध्यमांशी संवाद साधणार
बीड : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातील सुत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात 26 मार्चच्या मध्यरात्रीपासून ते 4 एप्रिलपर्यंत जिल्हा लॉक करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतही चर्चा झाली होती. अद्याप अधिकृत आदेश नसले तरी यासंदर्भातच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे उद्या (दि.24) सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्या पत्रकार परिषदेतून ते निर्णय घोषित करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, निर्बंध आणखी कठोर करावेत, परंतू लॉकडाऊन होऊ नये असा जनतेचा सूर आहे.