dhananjay-munde

धनंजय मुंडे दुसर्‍यांदा कोरोना पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची दुसर्‍यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती आहे आहे.

ट्वीटमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे, माझी आज दुसर्‍यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

 

12 मार्च रोजी घेतली होती लस
दरम्यान धनंजय मुंडे यांनी 12 मार्च रोजी परळी येथे कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी स्वतःच्या ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले.

Tagged