Beed Lockdown : काय सुरू राहणार? काय बंद असणार?

न्यूज ऑफ द डे बीड

सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा

बीड : जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अखेर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. 26 मार्च (25 च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून) ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेत जगताप यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक आर.राजा, सीईओ अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांची उपस्थिती होती.

काय राहणार बंद?
सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे. मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक प्रतिबंधित. उपहारगृह, सर्व अनुज्ञप्त्या, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, मार्केट (कोविड रूग्णांसाठी पूर्व परवानगी दिलेली जेवण पुरवठा करणारी यंत्रणा). सर्व केशकर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर दुकाने.
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद
सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर करता येईल. त्यासाठी सोबत ओळखपत्र, पुर्व परवानगी, वैद्यकीय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा लागणार आहे.
-सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर संपूर्णतः बंद राहील. कोविड उपाययोजनांसाठी काम करणार्‍या शासकीय यंत्रणांची (आरोग्य, पोलीस) वाहने यातून वगळण्यात आली आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पूर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक वाहन वगळण्यात आले आहे.
सर्व प्रकारचे बांधकाम बंद. यातून शासकीय बांधकामे वगळण्यात आली आहेत. संबंधित शाखा अभियंता यांनी तात्पुरते पास उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
-सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृहे, मंगल कार्यालय, हॉल, लॉनमधील समारंभ, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रम व सभा, धार्मिक स्थळ, सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील.
सर्व खाजगी कार्यालये संपूर्णतः बंद राहतील. परंतू 31 मार्च 2021 अखेरीस ताळमेळ. बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल (दुकानाचे शटर बंद करून आत कलोजिंगचे कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल)

काय राहणार सुरु?
-किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना 7 ते 9 या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.
-दुध विक्री व वितरण सकाळी 10 वाजेपर्यंत घरपोच करता येईल. दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. दूध विक्रेता व वितरकांना अ‍ॅन्टीजन अथवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल.
-भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील. किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता गल्लोगल्ली फिरुन सकाळी 7 ते 12 या वेळेतच विक्री करू शकणार.
-सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवांसह त्यांच्याशी निगडीत सेवा आस्थापना नियमित वेळेनुसार सुरु राहतील. लॉकडाऊनचा आधार घेऊन रूग्ण सेवा नाकारता येणार नाही.
-ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याशी संलग्न असलेली सर्व दुकाने लॉकडाऊन असेपर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील.
सर्व न्यायालये, शासकीय कार्यालये तसेच शासन अंगीकृत उपक्रम स्थानिक संस्थेची कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका शासन निर्देशानुसार 50 टक्के उपस्थिती मर्यादेनुसार सुरु राहणार. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. तथापि स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकार असेल.
-बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंप, नगर रोड, साई पेट्रोल पंप, बार्शी रोड, बीड हा पेट्रोल पंप 24 तास चालू राहील. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकच पेट्रोल पंप 24 तास चालू ठेवण्याबाबत तहसीलदारांच्या स्तरावरून आदेश देण्यात येतील. सदर ठिकाणाहून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन पुरवठा करण्यात येणार आहे.
-एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरु राहील. कर्मचार्‍यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक असेल.
सर्व दैनिक वर्तनामपत्रे, नियतकालीक यांची छपाई व वितरण व्यवस्था यांची कार्यालय शासकीय निमयानुसार सुरु राहतील. वर्तमानत्रपाचे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये करता येईल.
-संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटरकरीता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती विहीत निर्बंध व नियमानुसार सुरु राहतील.
-अत्यावश्यक सेवा देणार्‍या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना वाहने केवळ स्वतःसाठीच वापरण्यास परवानगी असणार आहे. ओखळपत्रे बंधनकारक असणार आहेत.
-औषध व अन्न उत्पादन संलग्न प्रक्रीया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील.
-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरावा.
-सर्व वैद्यकिय व्यवसायीक, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्स यांना जिल्हाअंतर्गत वाहतुकीस परवानगी असले. वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सुरु राहतील.
-अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असेल.
-शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल.
-रोहयोची कामे सोशल डिस्टन्सिगचे पालन करून सुरु राहतील.
-स्वस्त धान्य दुकाने 12 वाजेपर्यंत चालू राहतील.
या आदेशापूर्वी बाहेरगावी, परराज्य, देशात जाण्यासाठी रेल्वे विमानाचे तिकीट बुकींग केले असेल, त्यांना रस्ता प्रवासास परवानगी असेल सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे.
अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेले कारखाने,उद्योग कामाच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील पाणी पुरवठा (जार, टॅकर) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी (बँकींग, पोस्ट, एलआयसी, व इतर महत्वाच्या शासकीय कार्यालय व इतर आस्थापना यांना) सेवा पुरविणार्‍या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु ठेवता येतील.
सर्व ऑनलाईन सेवा पुरविणारे सीएससी नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.
अत्यावश्यक सेवेतील संस्था, घरगुती गॅस वितरक यांना व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यवहारासाठी ये-जा करण्यासाठी व व्यवहार करण्यासाठी परवानगी असेल. संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र सोबत असणार आहे.
जी व्यक्ती लसीकरण व अ‍ॅन्टीजन अथवा आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जाणार आहे. अशा व्यक्तींना एसएमएस आलेला असावा. तसेच, ओळखपत्र सोबत ठेवावे.
इतर जिल्ह्यात जाणार्‍या वाहनांना प्रवेश देता येणार आहे. तसेच, जड वाहतुकीस जिल्ह्यातून परवागनी असेल. परंतू, परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तीने अ‍ॅन्टीजन अथवा आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
सदरील आदेशाचे काटेकोर पालन करावे आदेशाचा भंग करणार्‍या व्यक्तीविरुध्द दंडात्मक तसेच कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

1
2
3
4
5
Tagged