RAHUL REKHAWAR

बाहेरुन येणार्‍यांसाठी संपूर्ण जिल्हाबंदी

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना पास देऊ नका-जिल्हाधिकारी

 बीड :  जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्‍यांसाठी संपूर्ण बीड जिल्हा बंदी असणार आहे. 

      कोवीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात अनलॉकची अंमलबजावणी केली जात आहे. राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, कामगार इत्यादींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व मा.पोलीस आयुक्त यांचेकडून ई परवाने दिले जातात. त्यामुळे इतर जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामधून बीड जिल्हयामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येवू नयेत. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्यास आधारकार्ड पत्यानुसार परवानगी द्यावी असेही नमुद करण्यात आले आहे. यातून केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा संबंधीच्या व्यक्तींना व वाहनांना सुट दयावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

Tagged