ACB TRAP

तहसीलदारास वाळूत लाच घेताना रंगेहाथ पकडले

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण: येथील राशन कार्ड घोटाळ्यातील सूत्रधार तथा पैठण येथील तत्कालीन तहसीलदार किशोर देशमुख यांनी वाळू माफियाकडून दीड लाख रुपयांचा लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.


पैठण येथील पंधरा हजार बोगस राशन कार्ड घोटाळ्यातील सूत्रधार व सध्या औरंगाबाद येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले किशोर देशमुख यांनी वाळू माफिया कडून वाळूची वाहतूक करून देण्यासाठी व पोलिस ठाण्यामध्ये लावण्यात आलेल्या वाहनाचा चांगला अहवाल सादर करण्यासाठी दीड लाख रुपयाची मागणी १० मार्च रोजी करण्यात केली होती. ठरलेली रक्कम वाळू ठेकेदाराकडून २२ मार्च रोजी रात्री उशिरा औरंगाबाद मधील क्रांती चौककडे जाणाऱ्या रोड वर खाजगी वाहनांमध्ये घेताना किशोर देशमुख यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि शेख, ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, गणेश चेके यांनी केली आहे.

Tagged