असे आहे बीड लोकसभेचं मतदानाचे वेळापत्रक

loksabha election 2024 न्यूज ऑफ द डे


बीड, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर चार जून रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार. महाराष्ट्रात 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे अशा पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडली जाणार आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रीया चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पार पडत आहे. यासोबतच शिर्डी, नगर, या लोकसभा मतदारसंघात देखील याच दिवशी मतदान प्रक्रीया पार पडत आहे.

असे असेल बीड लोकसभेचं वेळापत्रक

  • 18 एप्रिल रोजी नोटीफिकेशन
  • 25 एप्रिल रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
  • 26 एप्रिल रोजी छाननी
  • 29 एप्रिल रोजी फॉर्म माघारी घेण्याचा दिवस
  • 13 मे रोजी मतदान
  • 4 जून रोजी मतमोजणी