CORONA

महामारी सुसाट! सोमवारी 66 पॉझिटिव्ह; मंगळवारी पुन्हा एकाचा मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्हा हादरला : मृत्यूसंख्या 27 वर

बीड, दि. 28 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीने आता चांगलेच हातपाय पसरले असून ती सुसाट निघाली आहे. दिवसाकाठी 25 ते 75 रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. सोमवारी (दि.27) रात्री पावणे एक वाजता आलेल्या अहवालात 34 जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पुन्हा रात्री सव्वा नऊ वाजता आलेल्या अहवालात तब्बल 32 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अशाप्रकारे सोमवारच्या तारखेत एकूण 66 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 606 वर जाऊन पोहोचली आहे. त्यात 305 जणांना डिस्चार्ज मिळालेला असून 27 जणांचा मृत्यू झालेला आहे.
रात्री सव्वानऊच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये बीड तालुक्यातील 16 जणांचा समावेश आहे. त्यात भगवाननगर बालेपीरमधील 39 वर्षीय पुरुष, कबाडगल्लीतील 45 वर्षीय पुरुष, बागवान गल्ली पांगरी रोड 42 वर्षीय पुरुष, झमझम कॉलनी कौसर चौक 38 वर्षीय पुरुष, क्रांतीनगर 38 वर्षीय पुरुष, नेकनूर येथील एका रुग्णालयातील 35 वर्षीय महिला कर्मचारी, गजानन कॉलनी शाहुनगर 18 व 40 वर्षीय महिला, मांडवजाळी येथील 38 वर्षीय पुरुष, माळीवेसमधील 80 व 25 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, चर्‍हाटा कॉलनी दिलीपनगर पाटीजवळ 32 व 38 वर्षीय महिला व 43 वर्षीय पुरुष, काळेगाव हवेली 35 वषीय महिला, यांचा समावेश आहे.
तर परळी तालुक्यातील 11 जणांमध्ये पदमावती गल्लीतील 31, 42, 3, 23, 54, वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, धर्मापुरी येथील 28 व 30 वर्षीय पुरुष, माणिकनगर 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गेवराई तालुक्यातील रांजणी येथील 24 वर्षीय पुरुष व शहरातील मोटे गल्ली येथील 31 वर्षीय पुरुष, गणेशनगर 8 वर्षीय पुरुष, निकमगल्ली 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील 38 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अनेकजण नवे रुग्ण आहेत. त्यांना कुठल्याही पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवास नाही.

कोरोनाचे 3 बळी
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील 70 वर्षीय वृद्धाचा अंबाजोगाई येथे रविवारी सकाळी मृत्यू झाला होता. सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच, नवीन वसाहत, भाटवडगाव (ता.माजलगाव) येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. तर परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील महिलेचा अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनावरील उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ती 66 वर्षांची होती. आता बीड जिल्ह्यात एकूण बळींची संख्या 27 झाली आहे.

नेकनूर स्त्री व कुटीर रुग्णालयाची
महिला कर्मचारीही कोरोनाबाधित

नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयातील एका 35 महिला कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ती महिला परजिल्ह्यातून आल्यानंतर क्वारंटाइन न होता थेट सेवेवर रुजू झाली. सदरील महिला कर्मचार्‍यास कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिने (दि.26) रोजी स्वतःहून स्वॅब दिला. आज पॉझिटिव्ह अहवाल आल्याने नेकनूरमध्ये खळबळ उडाली. सदरील बाधित महिला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याचा संशय आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कारकून पॉझिटिव्ह; बीडच्या तहसील
कार्यालयाचे करणार निर्जंतुकीकरण

बीड येथील तहसील कार्यालयातील एक 38 वर्षीय कारकून कार्यालयात येऊन गेलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे कारकूनासह अन्य कर्मचार्‍यांना तीन दिवसापूर्वी क्वारंटाइन करुन तहसीलदारांसह अन्य कर्मचार्‍यांचे स्वॅब देण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या होत्या. आज आलेल्या अहवालात कारकून वगळता इतरांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तहसील कार्यालयाचे आज (दि.28) पूर्णतः निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून बाधित कारकूनाचा विभाग पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. अभ्यागतांसाठी विशेष सूचना जारी करण्यात येणार आहेत.

बीड जिल्हा कोरोना अपडेट (28 जुलै सकाळी 11 पर्यंत)

एकूण रुग्ण – 606
मृत्यू झालेले रुग्ण – 27
डिस्चार्ज – 305
उपचार- 274

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 –26)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44 (रात्री 1:00)
23 जुलै – 27 (रात्री 1:00)
24 जुलै – निरंक
25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)
26 जुलै – निरंक
27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32 )

Tagged