नवी दिल्ली, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर चार जून रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार. महाराष्ट्रात 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे अशा पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडली जाणार आहे.
असे आहेत मतदानाचे सात टप्पे
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
काय सांगितले मुख्य निवडणूक आयुक्तांनी?
- केंद्रीय निवडणूक आयोगाचे 2100 निरीक्षक तैनात.
- राजकीय प्रचारात मुलांचा वापर करण्यास बंदी.
- दिशाभूल करणार्या जाहीराती रोखणार.
- प्रचार करताना मर्यांदा ओलांडू नका. भाषेचा स्तर घसरू देवू नका. याची गंभीर दखल घेणार. आक्षेपार्ह वक्तव्य, द्वेष पसरवणारी भाषणे नकोत.
- याची हवा, त्याची हवा, असे मीडियाला छापता येणार नाही किंवा दाखवता येणार नाही.
- 85 वर्ष वयावरील व्यक्तींचे घरी जावून मतदान नोंदवणार
- मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, व्हीलचेअर.
- 40 टक्क्याहून अधिक अपंगत्व असलेल्यांना देखील फॉर्म डी 12 भरून घरून मतदानाची सुविधा.
- नो युवर कँडीडेट अॅपवरून उमेदवारांची माहिती मिळणार.
- मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
- यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद झाली आहे. देशात 82 लाख मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
- निवडणूक प्रक्रियेत मसल पावर, मनी पावर, गैरप्रकार आणि हिंसा रोखण्याचं मोठं आव्हान आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसेला स्थान नाही. हिंसाचार झाल्यास कारवाई होणार. हिंसाचार रोखण्यासाठी अधिक्षक आणि जिल्हाधिकार्यांना सक्त आदेश.
- कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
- भारतीय निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असते. यावर्षी जगभरात सर्वत्र निवडणुकांचे पर्व सुरू आहे. देशात एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक एतच्, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख , 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, 18 ते 21 वयोगटातील मतदारांची संख्या 21.50 कोटी, 12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
- जिथे कंत्राटी पद्धतीवर नोकर भरती करण्यात आली आहे, त्यांचा वापर या प्रक्रियेत करता येणार नाही. त्याचे आदेशही आम्ही जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्माचार्यांना निवडणुकांची ड्युटी लागणार नाही.
- आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार
- पेंशनचं काम
- आधारकार्ड बनवणं
- जाती प्रमाणपत्र बनवणं
- वीज आणि पाण्यासंबंधी काम
- साफसफाई संबंधी काम
- वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं
- रस्त्याच्या दुरुस्तीचं काम
- सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही
- आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत
- ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.
- आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी
- सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद.
- नव्या कामांचा स्वीकार बंद.
- सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत.
- मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत.
- सरकारी वाहनांना सायरन नाही.
- सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील.
- सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.
- वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत.
- कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.
- सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी खर्या खोट्या गोष्टींचा विचार करा. अत्यंत काळजीपुर्वक पोस्ट करा.