उद्या लोकसभेची आचारसंहिता लागणार

बीड

बीड, दि.15 : देशात 2024 साली होणार्‍या लोकसभेची आचारसंहिता नेमकी कधी लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे. आता याबाबत मोठी अपडेट मिळत आहे. ती म्हणजे निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केली जावू शकते. INDIA LOKSABHA ELECTION

राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. राजकीय पक्षांच्या प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र अद्याप निवडणुकीच्या तारखेची घोषणा झालेली नाही. मिळत असलेल्या माहितनुसार उद्या निवडणूक आयोग महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे उद्यापासूनच लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं जाणार आहे